शालेय मदत
Published on: September 14, 2025
शालेय पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा व्हाव्यात यासाठी विविध संस्थांमध्ये खालील उपक्रम राबवण्यात आले
१. वाचन पेटी
मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून गुरुवर्य वा. के . सावईकर संस्थापित सर्वोदय माध्यमिक शाळा वडर कॉलनी येथे वाचनपेटी चा एक उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आला आहे.
२. बोलक्या भिंती
शाळेत असलेल्या बोलक्या भिंती मुलांना खूप काही शिकवून जातात, ह्याच संकल्पनेतून काही महान व्यक्तींची प्रतिमा आणि त्याचे विचार अतिशय सुंदर पद्धतीने रेखाटून, संजय नगर मधील दुधाळ शाळेच्या भिंती बोलक्या करण्यात आल्या.यासाठी शांताज्ञानू फाउंडेशनचे मोलाचे सहकार्य लाभले.
3. बुक ड्राईव्ह( पुस्तक संकलन)
मूल मोठी झाली कि त्यांची लहानपणीची चांगली पुस्तकं पडून राहतात त्यांचा योग्य उपयोग व्हावा यासाठी आम्ही काही सोसायट्यांमधून पुस्तक ड्राईव्ह( पुस्तकं संकलन )घेतला होता, त्या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळाला, जवळ पास 100 चांगल्या पुस्तकांचे संकलन केले आणि कोल्हापूर जिल्यातील आलास येथील अंगणवाडी , गुरुवर्य वा. के . सावईकर प्राथमिक शाळा ,वडर कॉलनी येथे भेट म्हणून दिली.
४. ध्वनीयंत्रणा आणि फळा
सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मुलांना बालगीत कविता ऐकवण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील आलास या गावातील अंगणवाडीमध्ये ध्वनी यंत्रणा आणि मुलांना लांबूनही अक्षर व्यवस्थित दिसावीत यासाठी एक व्हाईट बोर्ड (फळा)देण्यात आला.
५.जिल्हा परिषद शाळा आमणापूर येथे संगणक कक्षासाठी 20 खुर्च्या देण्यात आल्या.

Moments That Matter

1 of 22