ज्ञान प्रबोधिनी विद्यार्थी मित्र प्रकल्पाची दुसरी आढावा बैठक
October 13, 2025
सेवाध्यास ज्ञान प्रबोधिनी विद्यार्थी मित्र प्रकल्प , या प्रकल्पाची दुसरी आढावा बैठक दिनांक ३०.०९.२०२५ रोजी पार पडली.
या बैठकीला सेवाध्यास फाउंडेशन चे विजय निकम,अमेय फाळके ज्ञानप्रबोधिनीचे श्री सुरज रसाळ सर आमच्या फॅसिलिटेटर सौ.आरती जाधव, सौ.गौरी हरगापुरे मॅडम उपस्थित होत्या.
शैक्षणिक प्रवाहात मागे पडत असणाऱ्या गरजू विद्यार्थांसाठी आम्ही हा प्रकल्प सध्या सर्वोदय शिक्षण मंडळाच्या गुरुवर्य वा.के. सावइकर प्राथमिक शाळा वडर कॉलनी सांगली,आणि महापालिका शाळा क्रमांक ६ ,मिरज येथे राबवित आहोत .
ज्ञानप्रबोधिनीचे श्री सुरज रसाळ सर यांनी आमच्या फॅसिलिटेटर सौ.आरती जाधव, सौ.गौरी हरगापुरे, यांना पुढील सत्रांबद्दल मार्गदर्शन केले.
आम्ही राबवत असलेल्या या प्रकल्पाला शाळेचे मुख्याध्यापक श्री अरविंद गावडे सर , चौगले मॅडम आणि शाळेतील विद्यार्थ्यांचा पॉझिटिव्ह प्रतिसाद मिळत आहे, शाळेला यायला टाळाटाळ करणारे विद्यार्थी आता उपस्थित राहु लागले आहेत.
हा प्रोजेक्ट खर्चिक असल्याने आम्ही
Hand holding आणि micro management करत आहोत.
देणगीचे सर्व पैसे योग्य पद्धतीने वापरले जातील यासाठी रचना बसविली जात आहे.
सूरज सरां बरोबर आढावा बैठक आणि शाळा भेटीच्या माध्यमातून दोघीना सातत्याने संपर्क ठेवून, दिशा दर्शन करण्याचे प्रयत्न चालू आहेत.