Latest News

ज्ञान प्रबोधिनीचे आनंदी शिक्षण प्रकल्प प्राथमिक शाळा वडर कॉलनी सांगली येथे

September 09, 2025

ज्ञान प्रबोधिनीचे आनंदी शिक्षण प्रकल्प प्राथमिक शाळा वडर कॉलनी सांगली येथे

शैक्षणिक प्रवाहात मागे पडणाऱ्या,शाळेला जाण्यासाठी टाळा टाळ करणाऱ्या ,अभ्यासात मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रवाहात राहावे या तळमळीतून सेवाध्यास फाउंडेशन ने ज्ञानप्रबोधिनी पुणे यांच्या सहकार्यातून ज्ञान प्रबोधिनीच्या आनंदी शिक्षण या प्रकल्पातील काही भाग गुरुवर्य वा.के.सावईकर प्राथमिक शाळा वडर कॉलनी सांगली आणि महापालिका शाळा नंबर ६ येथे राबवण्याचे ठरवले आणि आम्हाला प्रकल्प सहकारी म्हणून २ महिला सुद्धा मिळाल्या. प्रकल्प सुरू होऊन एक महिना झाला .त्याची आढावा बैठक आज पार पडली.



या बैठकीला सेवाध्यास सदस्य आरती गुर्जर आपटे, इरा कुलकर्णी,अरुणा रेपे,विदुला बर्वे ,विजय निकम ,अमेय फाळके उपस्थित होते, प्रकल्प सहकारी आरती जाधव मॅडम, गौरी हरगापूरे उपस्थित होत्या.

या प्रकल्पासाठी ज्ञानप्रबोधिनीचे श्री सूरज रसाळ सर,श्री अमर परांजपे सर ,मित्र अमित पेंडुरकर, सेवाध्यास सदस्य मृदुला लेले,विदुला जोशी,आरती घाळी, सावईकर शाळेचे मुख्याध्यापक श्री अरविंद गावडे सर ,महापालिका शाळा नंबर ६ टाकळी रोड ,मिरज च्या मुख्याध्यापिका चौगुले मॅडम यांचेही सहकार्य लाभत आहे.त्याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक आभार.